आमदारांनी मंजुर केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचे काम नांदरूख सरपंच रामचंद्र चव्हाण यांनी ग्रामस्थांच्या आडुन करू नये

नांदरुख ग्रामस्थ विलास चव्हाण यांचा सुचक सल्ला


नांदरूख येथील साळकुंभा कातवड नांदरूख व कुंभारमाठ आनंदव्हाळ कातवड नांदरूख रस्ता या रस्त्यासाठी स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक या योजनेतुन दोन्ही रस्त्यासाठी अडीच कोटी म्हणजे 5 कोटी रुपये तरतूद केली यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होते सरकार बदलल्या नंतर शिंदे सरकारने या कामांस स्थगिती देण्यास सुरुवात केली ही स्थगिती आमदार वैभवजी नाईक यांनी कोर्टात खटला दाखल करून उठवली तसेच नांदरूख गावांसाठी भरीव निधी देण्याचे काम आमदार वैभवजी नाईक यांनी केले आहे यात ग्रामपंचायत इमारत बांधणे, ग्रामपंचायत विस्तारीकरण करणे, श्री देव गिरोबा मंदिर हयमास्ट व परिसरातील सुविधा तसेच बीएसएनएलन टाॅवर अशी 6 कोटी च्या वरील कामे माजी सरपंच दिनेश चव्हाण यांच्या 5 वर्षा च्या कालावधीत आमदार वैभवजी नाईक व खासदार विनायक राऊत यांनी दिली त्यामुळे उगाचच सरपंच रामचंद्र चव्हाण यांनी ग्रामस्थांच्या डोळ्यात धुळफेक करून फुकाचे श्रेय घेण्याचे काम करु नये तसेच आपण किती निधी आणला हे जाहीर करावे असा सुचक सल्ला नांदरूख येथील ग्रामस्थ विलास चव्हाण यांनी दिला आहे.

मालवण (प्रतिनिधी)

error: Content is protected !!