आजगाव साहित्य कट्ट्याचा सदतिसावा मासिक कार्यक्रम

आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा सदतिसावा मासिक कार्यक्रम रविवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आजगाव मराठी शाळेत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा विषय ‘साहित्य सृष्टीत दिवाळी अंकाचे महत्व’ असा असून साहित्य कट्ट्याचे सदस्य दिवाळी अंकांविषयी बोलतील. दिवाळी अंकातील साहित्य, त्यांची मुखपृष्ठे, आतील व्यंगचित्रे ; तसेच दिवाळी अंकांची परंपरा याची सविस्तर चर्चा होईल.
तरी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी साहित्यप्रेमींनी जरूर उपस्थित रहावे,असे आवाहन साहित्य कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी केले आहे.
प्रतिनिधी, सावंतवाडी





