गुटखा विक्री प्रकरणी दोघांना 3 दिवसाची पोलीस कोठडी

मुख्य सूत्रधाराचा शोध घेणे, व गुटखा विक्री प्रकरणी मदत करणाऱ्या पर्यंत पोहचणार पोलीस

पोलीस उपनिरीक्षक रवी शेगडे यांची माहिती

अन्न व औषध प्रशासन सिंधुदुर्ग कार्यालयाला मिळालेल्या गोपनीय माहितीनूसार या विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुखे यांनी सोमवारी कणकवली बाजारपेठेतील दोन पानशॉपवर छापा टाकून 44 हजार 593 रु. प्रतिबंधित पानमसाला व व्ही वन सुगंधीत तंबाखू जप्त केला. या प्रकरणी दोन पानशॉप मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना दोन्ही संशयीतांना आज कणकवलीत हजर करण्यात आले दोघांनाही 23 नोव्हेंबर पर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. कणकवली आप्पासाहेब पटवर्धन चौकातील कोरगावकर पानशॉप पानशॉपचे मालक तुषार मंगेश कोरगावकर (28, रा. आशिये) याच्याकडून 14 हजार 661 रु.चा नजर, दुबई, विमल हा प्रतिबंधित पानमसाला व व्ही वन सुगंधीत तंबाखू जप्त करण्यात आला. तर दुसरी कारवाई कणकवली बाजारपेठेतील स्वामीदत्त पानशॉपवर करण्यात आली. या शॉपचे मालक विजय दिगंबर कोरगावकर (48, रा. विद्यानगर कणकवली) यांच्याकडून 29 हजार 932 रु. चा आरएमडी, नजर, विमल, दुबई, राजनिवास हा प्रतिबंधित पानमसाला आणि व्हीवन सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. या प्रकरणी न्यायालयात हजर करताना तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रवी शेगडे यांनी पोलीस कोठडी मागताना सदर मुद्देमाल कुठून आणला याचा तपास करायचा आहे. या गुटखा पुरवठादर मुख्य सूत्रधारचा शोध घ्यायचा आहे. तसेच संशयितांच्या मदतीसाठी कणकवलीत अन्य कोण साथीदार आहेत त्यांचा शोध घ्यायचा असल्याने पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. पोलिसांनी दिलेली कारणे न्यायालयाने ग्राह्य धरत तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली.

दिगंबर वालावलकर, कणकवली

error: Content is protected !!