खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत मृणाल सावंत तर वेशभूषामध्ये उत्तम कोंडुस्कर विजेते

श्री साई युवक मंडळ दाभोली आयोजित दीपावली शो टाइम
प्रतिनिधी । कुडाळ : श्री साई युवक मंडळ ,दाभोली दाभोलकरवाडी आयोजित. दीपावली शो टाईम अंतर्गत घेण्यात आलेल्या खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत तसेच वेशभूषा स्पर्धेत उत्तम कोडूस्कर विजेते ठरले.
श्री साई युवक मंडळ ,दाभोली दाभोलकरवाडी आयोजित.दीपावली शो टाईम अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन युवा उद्योजक नितीन मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. दाभोली उपसरपंच अनिमा फर्नांडिस, साई युवक मंडळ अध्यक्ष उदय दाभोलकर, दादा सारंग, वेंगुर्ले पोलिस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, पोलिस पाटील जनार्दन पेडणेकर, माजी सदस्य नरेश बोवलेकर, दत्ताराम दाभोलकर, बाळकृष्ण दाभोलकर, अनिल रेडकर, शशिकांत दाभोलकर, देवेंद्र दाभोलकर, रोहित दाभोलकर, मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी आदी उपस्थित होते.
खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा प्रथम मृणाल सावंत, द्धितिय पूर्वा मेस्त्री, तृतीय मृदूला बागायतकर, चौथा स्वरा पावसकर, पाचवा जयेश सोनुर्लेकर यांनी मिळविला. वेशभूषा स्पर्धा प्रथम उत्तम कोडूस्कर, द्वितीय श्रेयान कीनळेकर, तृतीय अथर्व दाभोलकर यांनी मिळविला. स्पर्धेचे परिक्षण ओमी डान्स अँकेडमीचे संचालक ओंकार परब व उदय दाभोलकर यांनी केले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.





