आचरा गाव विकासाला चालना मिळणार–सरपंच जेरॉन फर्नांडिसरामेश्वर देवस्थान समिती तर्फे नवनिर्वाचित सरपंच सदस्यांचा सत्कार
रामेश्वर देवस्थान समिती आणि ग्रामपंचायत यांच्या मध्ये गेली काही वर्ष समन्वय नसल्याने आचरा गाव विकासाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. मात्र आजच्या देवस्थान समिती ने आयोजित सत्कारामुळे ग्रामपंचायत आणि देवस्थान समिती एकविचाराने काम करणार असल्याने आचरा गाव विकासाला खरया अर्थाने चालना मिळणार असल्याचे मत आचरा नवनिर्वाचित सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी आचरा गावचा जमिन प्रश्न तातडीने निकाली काढून ग्रामस्थांना आश्वासित करण्याची विनंती देवस्थान समिती ला केली.
आचरा ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा देवस्थान समिती तर्फे रामेश्वर भक्त निवास येथे सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.यावेळी त्यांच्या सोबत व्यासपीठावर देवस्थान समिती अध्यक्ष मिलिंद मिराशी ,सचिव अशोक पाडावे,रविंद्र गुरव,संतोष मिराशी, अभय भोसले,डॉक्टर प्रमोद कोळंबकर,अर्जुन बापर्डेकर, मुझफ्फर मुजावर, बाळा घाडी यांसह नवनिर्वाचित सदस्य तसेच अन्य मान्यवर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना फर्नांडिस यांनी आचरा ग्रामसचिवालय, आचरा ग्रामिण आरोग्य केंद्र, निवारा शेड डंपिंग ग्राउंड आदी साठी देवस्थान समिती पदाधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले आहे..तसेच यापुढे लागणारे सहकार्य देण्याची ग्वाहीही देवस्थान समिती कडून देण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे गावविकासाला गती मिळणार असल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन अशोक पाडावे यांनी मानले.
आचरा, अर्जुन बापर्डेकर