17 वे केंद्रीय मराठी साहित्य संमेलन मॉरिशस मध्ये
आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलन 2 आणि 3 डिसेंबर रोजी
कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांची माहिती
मॉरिशस सरकारच्या कला व सांस्कृतिक वारसा मंत्रालयांतर्गत कार्यरत मराठी स्पीकिंग युनियन, तसेच मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन, मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण मराठी साहित्य परिषदेकडून आंतरराष्ट्रीय हृदयंगम मराठी साहित्य संमेलना’चे आयोजन 2 व 3 डिसेंबर 2023 रोजी होणार आहेत. या साहित्य संमेलनात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा जागर होणार आहेत.अशी माहिती कोमसाप चे केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ प्रदीप ढवळ यांनी दिली. कणकवलीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कोमसाप केंद्रीय मंडळ समिती सभासद उषा परब, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के, सभासद संदीप वालावलकर आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, ज्येष्ठ संपादक, लेखक विजय कुवळेकर यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड, तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे उद्घाटक आणि मॉरिशस येथील निशी हिरु या स्वागताध्यक्ष असणार आहेत. आंतरराष्ट्रीय हृदयगम मराठी साहित्य संमेलन ‘असे या संमेलनाचे नामकरण करण्यात आले असून, या दोन दिवसीय संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचा जागर मॉरिशसच्या भूमीवर होणार आहे.
या पत्रकार परिषदेत या संमेलनाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
कोकण मराठी साहित्य परिषद अर्थात ‘कोमसाप ही संस्था मराठी भाषा व साहित्याच्या प्रसारासाठी कोकण मराठी साहित्य परिषद अर्थात ‘कोमसाप ही संस्था मराठी भाषा व साहित्याच्या प्रसारासाठी गेल्या तीन दशकाहून अधिक काळ कार्यरत आहे. संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर विविध साहित्य संमेलने व साहित्यिक-सांस्कृतिक उपक्रमांद्वारे ‘कोमसाप मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीच्या जतन-सदर्धनासाठी अखंडपणे सक्रिय आहे. मॉरिशस येथी मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन, मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट आणिमॉरिशस सरकारच्या कला व सांस्कृतिक वारसा मंत्रालयांतर्गत कार्यरत मराठी स्पीकिंग युनियन यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेला मॉरिशस येथे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याकरिता निमंत्रित केले आहे.तीन दशकांपूर्वी मॉरिशस येथे विश्व मराठी साहित्य संमेलन झाले होते. त्यानंतर आता मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती यांचा जागर पुन्हा मॉरिशसच्या भूमीवर या संमेलनाच्या माध्यमातून होणार आहे.मराठी भाषा साहित्य, कला व संस्कृतीची ओळख नव्याने मॉरिशसच्या जनतेला करून देऊन मॉरिशस आणि महाराष्ट्र व पर्यायाने भारत यांच्यातील सांस्कृतिक आदान-प्रदान वृद्धिंगत करण्याचा या संमेलनामागील हेतू आहे. ‘कोमसाप’ चे संस्थापक व ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, मॉरिशसचे सांस्कृतिक कार्य मंत्री अविनाश तीललूक, मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री अलन गानू, मॉरिशसच्या शिक्षण मंत्री लीलादेवी दुकून लाचूमान, ‘कोमसाप’च्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, नियामक मंडळ सदस्य आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या समेलनात महाराष्ट्र आणि मॉरिशस येथील मान्यवर साहित्यिक, कवी, लेखक, कलावंत, रंगकर्मी, माध्यमकर्मी, भाषा व साहित्याचे अभ्यासक मंडळीसहभागी होणार आहेत.
या दोन दिवसीय संमेलनाच्या पहिल्या दिवशी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याबरोबरच ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रकाशन व प्रदर्शन, आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार असून त्यानंतर ‘देशविदेशातील मराठी भाषेचे जतन या विषयावरील परिसंवाद आणि निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. तर संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘वाचन : बदलता दृष्टिकोन आणि स्वरूप या विषयावरील परिसंवादाबरोबरच मान्यवराच्या मुलाखती तसेच कलाविष्कार व सांस्कृतिक कार्यक्रमांची सत्रे संपन्न होणार आहेत. या संमेलनातून मराठी साहित्य, कला, भाषा व आपल्या संस्कृतीचा सर्जनशील आविष्कार सादर करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे श्री ढवळ यांनी सांगितले.
कणकवली/ प्रतिनिधी