महाराष्ट्रात काय सोन्याच्या तारेने करंट पास करता का ; सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचा विद्युत मंडळाला सवाल
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी वीज बिले व वीजेचे प्रती युनिटमागे वाढीव दर यांबाबत विद्युत मंडळावर जोरदार टीकास्त्र सोडून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत राज्य शासनाने सामान्य माणसांना व महाराष्ट्र राज्यातील प्रत्येकाला उत्तर देणे सुद्धा आवश्यक असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्र संदेशाद्वारे नमूद केले आहे
श्री. राजेंद्र मनोहर पेडणेकर त्यांच्या प्रसिद्धी पत्राद्वारे म्हणतात की विद्युत मंडळाच्या भोंगळ कारभाराचा आता पर्दाफाश झालेला आहे. देशातील इतर राज्यांमध्ये २ रुपये ५० पैसे , २ रुपये ७५ पैसे असे युनिट मागे दर असताना महाराष्ट्र राज्यातच घरगुती युनिट मागे ७ रुपये व्यावसायिक दर तर अव्वाच्या सव्वा आहेत. हे नेमके कशासाठी, नक्की काय दडलय कारण याच्या मागे याची माहिती शासनाने देणे क्रमप्राप्त आहे
श्री. राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी पुढे विचारले आहे की एवढे दर फक्त महाराष्ट्र राज्यातच कशासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रात सोन्याच्या तारेतून विद्युत करंट पास होतो का असाही परखड सवाल हि त्यांनी केला आहे
सामान्य माणसाला कुणीही वाली नसतोच, हे आता सामान्य मराठी नागरिक चांगले ओळखुन आहेत
आणि म्हणूनच यांच्या मागील कारणे शोधण्याचा प्रयत्न केला, तर असे लक्षात आले की बड्या बड्या धेंडांची बिलांची थकबाकी ५ ते ६ लाख रुपये झाली, तरी त्यांचे कनेक्शन तोडले जात नाही कारण मोठ्या लोकांच्या ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्यामुळेच कदाचित कुठेतरी त्यांना लाभ व्हावा म्हणून असेल कदाचित् असाही गंभीर आरोप श्री. राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केला आहे.
आज मोठमोठ्या क्रशर कंपन्यांना विना परवाना, लाईन टाकून अनधिकृतपणे विद्युत पुरवठा सर्रास लूट केली जात आहे आणि याच कारणामुळे त्यांचे थकित बिले म्हणा किंवा चोरी करून घेतली जाणारे विद्युत जोडणी होते व ही सर्व बिले सामान्य माणसांच्या माथी मारायचे कारण सामान्य माणुस हा आधीच त्रस्त होऊन घाबरलेला आहे व तो ही बिले लोकलज्जेस्तव अगदी उपाशी राहून किंवा कर्ज काढून तरी भरेलच ही आता यंत्रणांना खात्री आहे. काही वर्षांपूर्वी ३ महिन्यांची बिले यायची, पण आता महिन्याला बिले येतात, म्हणजे स्थिर आकार ३ वेळी आकार ला जातोय हे काय चालले आहे असाही संतप्त प्रश्न राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी विचारला आहे. स्थिर आकार एक महिन्याचा ४७० रुपये, वहन आकार ३०० रुपये, इंधन समायोजन आकार ६५ रुपये, वीज शुल्क २१ टक्के प्रमाणे ६२२ रुपये, वीज विक्री कर ४९ रुपये आणि प्रत्येक बिला मध्ये थकबाकी जमा असे दोन वेळा ८ रुपये, म्हणजे बिल जर ३६३४ तर हे सर्व आकार वजा केले तर, १५०० ते १६०० रुपये आणि मग नेमकी कसली आकारणी केली जाते, ते फक्त विद्युत मंडळालाच माहित असा टोला राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी लगावला आहे.
गरिबांना एक वेळचे जेवण मिळणे अवघड झाले आहे सामान्य व्यापारी मंदी व इतर
महागाईने त्रस्त आहे याबाबत
थोडातरी माणुसकीने विचार करावा* असा सल्ला देताना
- श्री. राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी प्रसिद्धी पत्र संदेशाद्वारे मागणी केली आहे
की शासनाने यामध्ये लक्ष घालून नक्की काय चाललय याचा शोध घ्यावा आणि सामान्य नागरिकांना, व्यापारी वर्गाला, होतकरू उद्योजकांना व पर्यायाने खर्या महाराष्ट्र राज्याला न्याय द्यावा