कुडाळ देशकर युवा प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग मार्फत आदित्यचा गौरव सोहळा

पुणे येथील सतरा वर्षीय आदित्य सामंत हा ग्रॅंडमास्टर किताब मिळवणारा भारताचा ८३वा बुद्धिबळपटू
भारताचा ८३वा ग्रॅंडमास्टर सतरा वर्षीय आदित्य सचिन सामंत याचा गौरव सोहळा बुधवार दि. १५ नोव्हेंबर २०२३ रोजी कुडाळ देशकर युवा प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग मार्फत कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. पुणे येथील सतरा वर्षीय आदित्य सामंत हा ग्रॅंडमास्टर किताब मिळवणारा भारताचा ८३वा बुद्धिबळपटू ठरला आहे. त्यानिमित्त कुडाळ देशकर युवा प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग मार्फत आदित्यचा गौरव सोहळा बुधवार दि. १५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेचार वाजता मराठा समाज ए.सी. हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. हा गौरव सोहळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्ञातीचे ज्येष्ठ मार्गदर्शक गुरुवर्य का. आ. सामंत यांच्या हस्ते तसेच सारस्वत बँक संचालक श्री. अनिल आंबेसकर व तरुण भारत सिंधुदुर्ग रत्नागिरी आवृत्तीचे संपादक श्री. शेखर सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. यावेळी आदित्य सामंत याच्या छोटेखानी मुलाखतीचा कार्यक्रमही होणार आहे. या गौरव सोहळ्याला सर्व ज्ञाती बांधवांनी तसेच क्रीडा व बुद्धिबळ प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन कुडाळ देशकर युवा प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री. रणजित देसाई यांनी केले आहे.