प्राथमिक शाळा तोंडवळी च्या मुलांनी घेतला आकाश कंदील बनविण्याचा अनुभव

विद्यार्थ्यानी बनविलेल्या कंदिलांना विशेष मागणी

शालेय विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच कौशल्यात्मक विकास व्हावा,मुलांमध्ये आत्मविश्वास वाढावा,पारंपरिक कलांबद्धल ज्ञान व्हावे या उद्देशाने जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा तोंडवळी वरची या शाळेतील मुलांनी
कार्यानुभव विषयांतर्गत दीपावली उत्सवाच्या निमित्ताने आकाश कंदिल बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः आकाश कंदिल बनवून आपल्या स्वतःच्या घरी आकाश कंदिल लावण्याचा निश्चय केला.
सदर बनविलेले आकाश कंदिल पाहून तोंडवळी गावातील ग्रामस्थांनी आकाश कंदिल विकत मिळण्याची मागणी केली. त्यासाठी सर्वांनी अधिक मेहनत घेऊन दिवसभरात एकूण 200 आकाश कंदिल बनविण्यात आले. ही कार्यशाळा शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. शीतल माडये, पदवीधर शिक्षक पांडुरंग कोचरेकर, पदवीधर शिक्षिका श्रीम. स्मिता परब, उपशिक्षिका श्रीम. सोनल कदम, श्रीम. विभा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश चव्हाण तसेच सर्व सदस्य व पालक यांचे सहकार्य लाभले.
या शाळेला शैक्षणिक उठावांतर्गत तोंडवळी वरची येथील श्रीम.दिपलक्ष्मी आशिष पेडणेकर यांनी दोन सिलिंग फॅन दिले. त्याबद्दल या शाळेतील सर्व शिक्षकवर्ग, शाळा व्यवस्थापन समिती व सर्व पालक त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत.

आचरा–अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!