हस्ताक्षर स्पर्धेमध्ये नील बांदेकर राज्यात प्रथम

अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई आयोजित राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत केंद्र शाळा बांदा नंबर येथे इयत्ता पाचवी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु.नील नितीन बांदेकर याने संपूर्ण राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.
यासाठी नीलला त्याचे मामा बालरोगतज्ज्ञ डॉ.उमेश सावंत यांचे योग्य असे मार्गदर्शन लाभले
नीलने आतापर्यंत वेशभूषा, कथाकथन,चित्रकला, वक्तृत्व, निबंध ,गीत गायन ,हस्ताक्षर, यांसारख्या अनेक विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन 150 हुन जास्त बक्षीस पटवाली आहेत .त्याच्या या यशाबद्दल नीलवर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
बांदा (प्रतिनिधी)





