स्वामी भक्तांसाठी आनंदाची पर्वणी; खोटलेत भव्य उत्सवाचे आयोजन

धार्मिकतेसोबत समाजसेवेचा संगम

काकड आरतीपासून दशावतार नाटकापर्यंत कार्यक्रमांची रेलचेल

श्री स्वामी समर्थ धार्मिक आणि सामाजिक न्यास, खोटले यांच्या वतीने भव्य श्री स्वामी समर्थ उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ५.३० वाजता काकड आरती आणि नित्योपासनेने होणार असून, त्यानंतर हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८.३० वाजता लघुरुद्र आणि स्वामींची अलंकार पूजा पार पडणार आहे. तसेच सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, तर दुपारी १२.३० वाजता महाआरती आणि महाप्रसाद होणार आहे. दुपारी २ वाजता कुंकूमार्चन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ६ दरम्यान भव्य महापालखी सोहळा पार पडणार असून, यात ढोलपथक, फुगडी नृत्य, चित्ररथ आणि दिंड्यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी ७ वाजता कोकणातील कलावंतांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर रात्री ९.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ८ वाजल्यापासून विविध भजन मंडळांचे सादरीकरण होणार असून, रात्री १०.३० वाजता ‘शिव मंगळागौरी’ या दशावतार नाटकाचे सादरीकरण होणार आहे. या भव्य उत्सवासाठी आयोजकांनी भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!