आचरा ग्रामपंचायत साठी मतदान शांततेत

आचरा ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी एकून पाच केंद्रावर सकाळपासूनच मतदान शांततेत सुरू होते.दुपारपर्यंत साधारण पन्नास टक्के च्या आसपास मतदान झाले.मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांनी मतदान केंद्राना भेट देत आढावा घेतला होता. काही मतदान झाल्यावर केंद्र पाचची ईव्हीएम मशिन सकाळी आठ वाजून दहा मिनिटाच्या सुमारास बंद पडल्याने नविन मशीन बसवून मतदान सुरू करण्यात आले होते.त्यामुळे या केंद्रावरचे मतदान सुमारे अर्धा पाऊण तास ताटकळले होते.तर गाऊडवाडी केंद्रावर मतदार यादीच अस्पष्ट असल्याच्या कारणास्तव मतदान धिम्या गतीने होत होते.त्यामुळे या केंद्रावर युवामतदारांसह वृद्ध मतदार ताटकळत असल्याचे दिसून येत होते.
आचरा ग्रामपंचायतींच्या सरपंचासह एकूण तेरा सदस्यांसाठी आज मतदान सुरू झाले आहे.सरपंच पदासाठी तीन उमेदवार आमनेसामने उभे ठाकले आहेत. यात भाजपाशिवसेनायुतीचे जेरॉन फर्नांडिस तर शिवसेना ठाकरे गटाचे मंगेश टेमकर यांच्यामध्येच लढत होण्याची शक्यता आहे.
आचरा, अर्जुन बापर्डेकर
