सरकारी नोकरी ही स्पर्धा परीक्षा देऊनच मिळवता येते – तहसीलदार अमोल पाठक.
युनिक अकॅडमी सिंधुदुर्ग आणि एसआरएम कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने नियमित प्रशिक्षण वर्ग
२० फेब्रु. पासून तलाठी व संयुक्त पूर्व परीक्षा बॅच सुरु
विक्रीकर निरीक्षक सुरभी कडुलकरचा सत्कार.
प्रतिनिधी । कुडाळ. : कोकणातील विद्यार्थ्यांनी हे समजून घेतलं पाहीजे की स्पर्धा परीक्षांची तयारी केल्यास सरकारी सेवेत संधी उपलब्ध आहेत आणि सरकारी नोकरी ही स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमावर आधारीत परीक्षा देऊनच मिळवता येते दुसरा कुठलाही पर्याय नाही असा सल्ला उपस्थित विद्यार्थ्यांना युनिक अकॅडमी सिंधुदुर्ग आणि संत राऊळ महाराज महाविद्यालंय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व नियमित प्रशिक्षण वर्गाचे उदघाट्न करताना दिला.
यावेळी , युनिकची सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालेली विद्यार्थिनी सुरभी कडुलकर, कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, प्राचार्य झोडगे, कुडाळ नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक, युनिक अकॅडमी सिंधुदुर्गचे प्रमुख एस.के.कोर्लेकर, डॉ.एस.एस.लोखंडे, डॉ.तुपेरे, सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विक्रीकर निरीक्षक STI झालेल्या युनिक अकॅडमी कणकवलीच्या विद्यार्थिनी सुरभी कडुलकर हिचा कॉलेजच्या वतीने प्राचार्य झोडगे सर यांनी सत्कार केला.
युनिकच्या विद्यार्थिनी आणि कुडाळ नगरपंचायतच्या प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक मॅडम यांनी आणि सत्कार मूर्ती सुरभी कडुलकर यांचे अभ्यास ते अधिकारी पर्यंतचा प्रवास अनुभव सांगितला. यावेळी प्राचार्य झोडगे सर म्हणाले, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांचा आपल्या करियर साठी करून घेता आला पाहीजे. प्रस्तावीक युनिकचे एस के कोर्लेकर यांनी तर सूत्रसंचालन डॉ.एस एस लोखंडे आणि आभार डॉ.तुपेरे सर यांनी मानले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.