रंगकर्मी सुहास वरूनकर यांचे कणकवली निवासस्थानी होणार रंगभूमी दिन
दिनांक पाच नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे रंगकर्मी, रंगप्रेमी रसिकांसाठी अतिशय आनंदाचा दिवस असतो. दरवर्षी हा दिवस नटराज पूजनाने साजरा केला जातो याही वर्षी आपण सर्वांनी मिळून हा दिवस दिमाखदार रीतीने कणकवलीत ज्येष्ठ रंगकर्मी सुहास वरुणकर यांच्या. निवास स्थानी दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठीक सहा वाजून 30 मिनिटांनी नटराज पूजन करून साजरा केला जाणार आहे.
यावेळी कलावंतांना या दिवसाचे औचित्य साधून आपली कला सादर करायची असेल तर त्यांच्यासाठी पाच मिनिटांचा वेळ देण्यात येणारआहे.
दिनांक पाच नोव्हेंबर 2023 सायंकाळी ठीक 06:30 श्री सुहास वरणकर यांचे घरी शिवाजीनगर गल्ली नंबर एक मुक्काम पोस्ट तालुका कणकवली येथे वेळीच उपस्थित राहवे अधिक माहितीसाठी 8600249624/9422967648. येथे संपर्क साधावा असे आवाहन. करण्यात आले आहे.
कणकवली (प्रतिनिधी)