ओंबळ मध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का
ओंबळ सरपंच, उपसरपंचांसह सदस्य भाजपमध्ये
देवगड- ओंबळ येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला भाजपा आमदार नितेश राणे यांनी मोठा धक्का दिला आहे. ग्रामपंचायत ओंबळचे सरपंच अरुण राजाराम पवार, उपसरपंच प्रवीण पवार,यांच्या सह सदस्य व ग्रामस्थ यांनी भारतीय जनता पार्टीत मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश केला. सरपंच, उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या या पक्ष प्रवेशामुळे ठाकरे सेनेला ओंबळ गावात खिंडार पडले आहे.
कणकवली येथे ओमगणेश निवासस्थानी सरपंच अरुण राजाराम पवार, उपसरपंच प्रवीण पवार याच्या सह ग्रामस्थ शरद पवार, सहदेव पवार, जितेंद्र पवार, चंद्रकांत पवार, महेश ओंबळकर, चंद्रकांत गावडे, नरेंद्र पवार, राजेंद्र पवार, अजित पवार, प्रशांत पवार, आदींनी पक्ष प्रवेश केला.यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर,डॉ.अमोल तेली, संदीप साटम, बंड्या नारकर, अमित साटम, राजेंद्र शेट्टे, आदी सह असंख्य भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
ओंबळ गावच्या विकासासाठी आमदार नितेश राणे यांचे नेतृत्व गरजेचे आहे. केद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मार्गदर्शन घेवून गावाच्या विकासाला अधिक गती देणार असे सरपंच अरुण पवार, उपसरपंच प्रवीण पवार यांनी सांगितले.