माणगावात सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांची पुण्यतिथी साजरी

निलेश जोशी । कुडाळ : शिखर बँकेचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांची १२ वी पुण्यतिथी माणगाव येथे साजरी करण्यात आली. शिवराम भाऊ जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी दादा बेळणेकर सगुण धुरी प्रकाश मोरये सुभाष भिसे ,समिर दळवी , प्रकाश म्हाडगुत , दिलीप माळकर, महादेव गावडे, विनोद जाधव, मंजुषा परब, वैशाली प्रभू , मदन गोसावी, जनार्दन कदम, योगेश बेळणेकर, श्रीनिवास बेळणेकर, पतसंस्था अधिकारी, कर्मचारी, ग्राहक, सहकारातील मान्यवर आदी उपस्थित होते.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.





