मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी 5 नोव्हेंबर ला “खारेपाटण पंचक्रोशी मराठा समाजाची” बाईक रॅली

खारेपाटण येथे पंचक्रोशीतील मराठा समाजाची बैठक संपन्न
31 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता ‘मराठा समाज खारेपाटण पंचक्रोशीची मीटिंग नृसिंह मंदिर येथे पार पडली, यावेळी खारेपाटण, नडगिवे, वायंगणी, शेर्पे, कुरंगवणे, बेर्ले, चिंचवली या पंचक्रोशीतील गावातून जवळपास 40/45 समाज बांधव हजर होते…त्यावेळी मा.मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला खारेपाटण पंचक्रोशीतील सकल मराठा समाजाचा पाठींबा व त्यांनी केलेल्या मागण्यांना समर्थन जाहीर करण्यात आले…
सध्या आरक्षणाचे वास्तव व सद्यस्थितीबाबत चर्चा झाली…
काही बांधवांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचे उदाहरण सांगितले व आरक्षणाची आवश्यकता का आहे यावर चर्चा केली गेली…
त्यानंतर येत्या रविवार दि.5 नोव्हेंबर 2023 रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा व आरक्षणाच्या समर्थनार्थ नृसिंह मंदिर, खारेपाटण ते चिंचवली-बेर्ले-शेर्पे-कुरंगवणे-नडगिवे-वायंगणी मार्गे खारेपाटण अशी मोटार सायकल रॅली काढून एसटी स्टँड येथे मराठा आरक्षण लढ्यात बलिदान केलेल्या बांधवांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली वाहिली जाणार आहे…तरी पंचक्रोशीतील जास्तीत जास्त मराठा बांधवांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मराठा समाज खारेपाटण पंचक्रोशीच्या वतीने करण्यात येत आहे…कोणत्याही प्रकारे उद्रेक न होता शांततापूर्ण व अहिंसक मार्गाने आपला आरक्षणाचा लढा लढणार असल्याचे मराठा समाज खारेपाटण पंचक्रोशीच्या वतीने सांगण्यात आले आहे.’मराठा समाज खारेपाटण पंचक्रोशी’ ची मीटिंग नृसिंह मंदिर येथे पार पडली, या मिंटिंग मध्ये रमाकांत राऊत, चंदूकाका शिंदे, विजय देसाई, रघुवीर राणे, जगदीश सावंत, दिगंबर भालेकर, अतुल कर्ले, सुधाकर कर्ले, प्रताप फाटक, बबलू पवार, ऋषिकेश जाधव यांच्यासह जवळपास 45/50 मराठा बांधव उपस्थित होते.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण