राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांचे बांद्यात तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी व कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादीच्या संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांचे आज बांद्यात राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी व कार्यकर्त्यांकडून ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी पत्रकारांशी बोलतांना सरकारवर सडकून टीका केली.हे ट्रिपल इंजिन सरकार आहे मराठा आरक्षण द्यायला अपयशी ठरले.हे खोके सरकार आहे आश्वासना पलिकडे काही करणार नाही असा टोला यावेळी खासदार सुळे यांनी लगावला.
यावेळी राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे परब माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले जिल्हाध्यक्ष अमित सामंत,सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, वैभव परब,आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सावंतवाडी प्रतिनिधि