टर्मिनससह हत्ती, रोजगाराच्या प्रश्नांकडे सुप्रिया सुळेंचे लक्ष वेधणार

राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे
राष्ट्रवादीकडून दोडामार्गसह बांदा, सावंतवाडीत जल्लोष स्वागत करणार
सिंधुदूर्ग जिल्ह्यात १३ वर्षांनी राष्ट्रवादीच्या महिला नेत्या सौ. सुप्रिया सुळे 27 सिंधुदुर्ग दौर्यावर येत आहे. त्यांच्याकडे सावंतवाडी टर्मिनस, आडाळी एमआयडीसी, हत्ती प्रश्न, रोजगार आणि पर्यटन या विषयावर लक्ष वेधण्यात येणार आहे. दोडामार्ग, बांद्यासह सावंतवाडीत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे यांनी आज येथे दिली.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले , तालुका अध्यक्ष पुंडलीक दळवी तसेच अन्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी या पत्रकार परिषद वेळी उपस्थित होते.





