कणकवली उपविभागातील 135 महसूली गावा करिता पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर

लवकरच पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबविणार
पोलीस स्टेशन, दूरक्षेत्र असलेल्या ठिकाणी पोलिस पाटील भरती होणार नाही
प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची माहिती
कणकवली उपविभागामधील कणकवली देवगड व वैभववाडी या तीन तालुक्यांमध्ये पोलीस पाटील पदा चे आरक्षण बिंदू नामावली नुसार जाहीर करण्यात आले असून त्यानुसार लवकरच या आरक्षणाप्रमाणे भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ज्या गावाच्या हद्दीत पोलीस स्टेशन किंवा पोलीस दुरक्षेत्र आहे अशा ठिकाणी पोलीस पाटील हे पद शासन आदेशानुसार भरती केले जाणार नसल्याची माहिती प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी दिली. त्यामुळे येत्या काळात अशा गावांना पोलीस पाटील या पदा ऐवजी थेट पोलीस स्टेशन शी संपर्क साधावा लागणार आहे. आज जाहीर केलेल्या आरक्षण सोडती नुसार कणकवली तालुक्यामध्ये नेहरूनगर दाबगाव सांगवे, तिवरे, साकेडी, नरडवे, या गावांमध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षण तर वैभववाडी मध्ये टेबवाडी अनुसुचित जाती, देवगड खुडी, गडिताम्हणे अनुसूचित जाती महिला, वैभववाडी मांडवकरवाडी, कोळपे, एडगाव, जांभवडे, अनुसूचित जाती, कणकवली नवीन कुर्ली, कळसुली अनुसूचित जाती महिला, देवगड पुरळ अनुसुचित जाती, वैभववाडी सडुरे अनुसूचित जाती महिला, देवगड कुळवे अनुसूचित जाती महिला, देवगड ठाकूरवाडी, गिर्ये रामेश्वर, तळेबाजार, अनुसूचित जमाती महिला, कणकवली मध्ये हळवलं,तळेरे, आयनल, शिरवल, शिवडाव, नडगिवे, अनुसूचित जमाती, देवगड तोरसळे, धोपटेवाडी, टेबवली, सांडवे, जुवेश्वर, गिर्ये अनपूर, अनुसूचित जमाती, कणकवली शिवाजीनगर अनुसूचित जमाती महिला, देवगड हुर्शी अनुसूचित जमाती, देवगड मोहुळगाव अनुसूचित जमाती महिला, देवगड वाघोटन विमुक्त जाती अ, वैभववाडी नारकरवाडी विमुक्त जाती अ, देवगड खुडी विमुक्त जाती अ महिला, वैभववाडी कुसूर, भटक्या जमाती ब, कणकवली उपनगर, आनंदनगर, संभाजीनगर खारेपाटण नजीक, भटक्या जमाती ब, देवगड आडबंदर, फणसगाव, भटक्या जमाती ब, कणकवली कुरगवणे भटक्या जमाती ब महिला, वैभववाडी बांधवाडी भटक्या जमाती ब महिला, वैभववाडी वायबोशी, नावळे, शिराळे – अरुळे, अरुळे, भटक्या जमाती क, देवगड गोवळ भटक्या जमाती क, वैभववाडी मोहितेवाडी भटक्या जमाती क महिला, कणकवली उत्तमनगर, नागसावंतवाडी, भटक्या जमाती क महिला, कणकवली तरदले भटक्या जमाती क, देवगड रहाडेश्वर भटक्या जमाती ड महिला, कणकवली औदुंबरनगर भटक्या जमाती ड महिला, वैभववाडी उपळे भटक्या जमाती ड, देवगड मुटाट भटक्या जमाती ड, कणकवली वारगाव भटक्या जमाती ड, देवगड मोर्वे, विरवाडी, वाडातर, विशेष मागास प्रवर्ग, देवगड कातवणेश्वर विशेष मागास प्रवर्ग महिला, देवगड कलंबई, चिंचवाड, बागमळा,तांबळडेग, विठलादेवी, तिर्लोट, लिंगडाळ, इतर मागास प्रवर्ग, देवगड पडवणे, वाडाकेरपाई, कसबा – वाघोटण, नाद, माळेगाव, इतर मागास प्रवर्ग महिला, कणकवली नवानगर, लिंगेश्वर, कासार्डे, शिवाजीपेठ नांदगाव, इतर मागास प्रवर्ग, वैभववाडी खाबलवाडी, कुंभारवाडी इतर मागास प्रवर्ग महिला, वैभववाडी नाधवडे, नेर्ले, दिगशी, तिथवली इतर मागास प्रवर्ग, कणकवली जांभळनगर कासार्डे इतर मागास प्रवर्ग महिला, कणकवली वायंगणी, रामेश्वरनगर, घोणसरी, कुंभवडे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, वैभववाडी मेहबुबनगर, पिंपळवाडी, निमतवाडी, आखवणे भोम नागपवाडी पुनर्वसन गावठाण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक,देवगड कातवण, कालवी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, कणकवली पिंपळेश्वर नगर, सुभाषनगर, श्रीनगर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक महिला, वैभववाडी घाणेगडवाडी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक महिला, देवगड मोंडपार, पाळेकरवाडी, सर्वसाधारण महिला, देवगड फणसे, पावणाई, पाटथर, सर्वसाधारण, कणकवली आवळेश्वर, गांधीनगर, जाभळगाव, बंदरगाव, सर्वसाधारण महिला, कणकवली उल्हासनगर, काजीर्डे, गांगेश्वर, धारेश्वर, वरवडे, ब्रम्हनगरी, भैरवगाव, यवतेश्वर, राजनगर, रांजणगाव, शास्त्रीनगर, हुबरणे, सर्वसाधारण, वैभववाडी सांगुळवाडी, भोम, मांगवली, मौदे, रिगेवाडी, करूळ, भट्टीवाडी, जामदारवाडी सर्वसाधारण, वैभववाडी खंबाळे, हेत, भुसारवाडी, कुंभारी, सर्वसाधारण महिला, अशा एकूण 135 महसुली गावांना पोलीस पाटील पदा करता आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. लवकरच या आरक्षण नुसार भरती प्रक्रिया जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे अशी माहिती अधिकारी जगदीश कातकर यांनी दिली. दरम्यान आज कणकवली तहसीलदार कार्यालयात झालेल्या या आरक्षण सोडत प्रसंगी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, नायब तहसीलदार शिवाजी राठोड यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर /कणकवली




