स्त्रियांना सन्मानाने जगू द्या-लेखा मेस्त्री.

कणकवली/मयुर ठाकूर.
मी एक स्त्री, मुलगी, बहीण, आत्या, मावशी, आई, काकी, मामी, आजी, शाळेतली बाई, काॕलेजातली मैत्रीण , नोकरीतील सहकारी, आॕफिसर, नर्स, डाॕक्टर, शास्त्रज्ञ , दुकानदार, ड्रायव्हर, कंडक्टर, मासे/भाजी/फुल विक्रेती.............अशीच माझी असंख्य रुप , आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात भवताली वावरतच असतात.
मी!
कणकवलीतील काही सुजाण, संवेदनाशील मनाच्या, माणूस म्हणून जगु इच्छिणाऱ्या ” मानवता ,” ग्रुपची सदस्या.
मगाशी ” सामुहीक बलात्कार, “तो ही , घटस्थापने दिवशीच???
वाचल आणि अवाक झाले.
ही कणकवली , विकासाच व्हिजन, सुसंस्कृत तालुका, बाबांची कर्मभुमी, कार्यसम्राटांची मायभुमी! तिथे हे घडलय.
फारच धक्कादायक.
वाचुन 3तासानंतरही सर्वच शांत.
1) मला प्रश्न पडला?
2) सगळे गैले कुठे?
3) का फक्त मणिपुरच्या स्त्रीयांच्याअन्यायासाठी आमच दुखत?
4) आपल्या आयुष्यातील स्त्रियांना फक्त देव्हार्यात बसवून ठेवणार.?
5) नुसती तक्रार करायलासुध्दा 5/6 दिवस?
6) ह्या पुरुषांना आई नाहीच?
7) पटवर्धन चौकात काही तासांचा तमाशा कधी होणार?
8) ऊद्या ह्याच सुजाण कणकवलीतील सुज्ञ सरकारी वकिल ही मुल कशी निष्पाप आहे हे सहजच सिध्द करतीलच.
कारण पैसा/ प्रसिध्दी?
9) ह्या गुन्हेगारांच्या वकिलाला आईही नाही, मुलगी ही नसावीस वाटतय.
10) सर्वच राजकीय व्यासपिठ नवरात्रीचा जागर करण्यात दंग, ह्या देवीकडे पहायला, सावरायला वेळ नाही.
मी स्त्री म्हणून सांगतेय,
ह्यापुढे प्रत्येक बाईने स्वताः तसेच आपल्या वआजुबाजुच्या लहान मुलींना, कोणत्याही पुरुषाला लांबच ठेवा, संशयी नजरेनेच बघा, मग भले तो बाप, भाऊ, शिक्षक, काका, मामा, आजोबा…… अगदी कोणत्याही संदर्भात असो.
अस आम्ही आमच्या लेकीबाळींना शिकवाव का?
असे अनेक विचार, प्रश्न……
अस्वस्थ /त्रस्त मनाने लिहीतेय.
दोष सगळ्यांचा नाही, पण शांत रहाणारेपण तितकेच दोषी.
पेटलेल्या वणव्यात सुक्याबरोबच ओलही
सुरक्षेची अपेक्षा असणारी स्त्री हे लिहीतेय.
- दुर्गेच्या जागराला येणार ?
- नरवृत्तीला आळा बसावा म्हणून ठोस पावल ऊचलणार?
- लिंगापलीकडेही जावून सन्मानाने जगू देणारा समाज घडवणार?
का हतबलतेन..
लेखा मेस्त्री-कलमठ