कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग यूडीआयडी प्रमाणपत्र शिबिर

लाभ घेण्याचे करण्यात आले आहे आवाहन
उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे 20 ऑक्टोबर रोजी दिव्यांग यूडीआयडी प्रमाणपत्र शिबिर आयोजीत करण्यात आले असून सदर शिबिरामध्ये दिव्यांगाची तपासणी करण्यात येऊन यूडीआयडी कार्डकरिता आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन नोंदणी करणेत येणार आहे. तरी तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना आवाहन करणेत येते की, त्यांनी दिनांक 20 ऑक्टोबर रोजी उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे सकाळी १०.३० ते १.०० या वेळात उपस्थीत राहून ‘यूडीआयडी कार्ड साठीची नोंदणी व तपासणी करून घ्यावयाची आहे. सदर शिबिरास येताना खालिल कागदपत्र सोबत घेऊन यावयाचे आहे. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीने तपासणीस येताना ” शासनाच्या https://www.swavlambancard.gov.in/ या वेब साईटवर ऑनलाईन नोंदणी करून त्याची प्रत सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. असे आवाहन उपजिल्हा रुग्णालय कणकवलीच्या वतीने करणेत येत आहे .
कणकवली प्रतिनिधी




