पळसंब गावात बीएसएनएल नाॅट रिचेबल

पळसंब ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
आचरा–डोंगराच्या कुशीत वसलेल्या पळसंब गावात गेले काही दिवस बीएसएनएल चे नेटवर्क गायब झाले असून याबाबत संबंधित कार्यालयाशी पत्रव्यवहार करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आंदोलन छेडण्याचा इशारा पळसंब सरपंच महेश वरक यांनी दिला आहे. पळसंब गावात संपर्कासाठी बहुतांशी लोक बीएसएनएलवर अवलंबून आहेत.पण गेले काही दिवस बीएसएनएलचे नेटवर्कच गायब झाल्याने येथील लोकांना फोन लावण्या साठी बाजूच्या गावातील नेटवर्क चा आधार घ्यावा लागत आहे.यामुळे येथील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत पळसंब सरपंच महेश वरक यांनी भारत संचार निगमशी पत्रव्यवहार करूनही कोणतीही कार्यवाही केली जात नाही.पळसंब गावातील मोबाईल टॉवर नादुरुस्त होण्यास भारत संचार निगमने बसवलेली जुनाट मशिनरीच कारणीभूत असल्याचा आरोप पळसंब सरपंच महेश वरक यांनी केला आहे.येत्या पंधरा दिवसांत या बाबतीत योग्य ती कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा वरक यांनी दिला आहे.
आचरा–अर्जुन बापर्डेकर




