मसुरेत ‘कवितांचा’ अक्षर जागर कार्यक्रम!

कोमसाप मालवण व बागवे हायस्कूल सांस्कृतिक समितीचे संयुक्त आयोजन

मसुरे : ” माणुसकीची व्याख्या बदलली, सारे जग बदलत आहे, गर्दीत माणसांच्या मी, माणूस शोधत आहे.” या आणि अशा अनेक कवितांनी यादगार ठरले ते मसुरे येथील कविसंमेलन! मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण,आर. पी. बागवे हायस्कूल सांस्कृतिक समिती मसुरे एज्युकेशन सोसायटी लोकल कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अक्षरजागर मसुरे गावचा’ हा अभिवाचन, काव्यवाचन, काव्यगायनाचा कार्यक्रम लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली आर. पी .बागवे हायस्कूल मसुरे येथे आयोजित करण्यात आला होता.
उदघाटन प्रसिद्ध मालवणी, कोकणी कवी रुजरिओ पिंटो यांनी केलं.
कोमसाप शाखा मालवणतर्फे २० मुलांना मोफत बालसदस्यत्व देण्यात आले. लहान व मोठा गट व मान्यवर अशा एकूण ५० कवींनी अप्रतिम कविता सादर केल्या. सौ. वर्षाराणी अभ्यंकर यांनी मसुरेचे वर्णन असलेल्या प्रसिद्ध लेखक आणि कॊमसापचे संस्थापक मधू मंगेश कर्णिक यांच्या “माझा गाव
माझं मुलूख”” या पुस्तकातील निसर्गरमणीय मसुरे या भागाच अभिवाचन केलं.
यावेळी सदानंद कंबळी, रवींद्र वराडकर, मुख्याध्यापक किशोर चव्हाण, मनाली फाटक, संजय बागवे, उत्तम राणे, विलास मेस्त्री, विठ्ठल लाकम, एस.आर.कांबळे, मंदार सांबारी, शिवराज सावंत, भरत ठाकूर, पंढरीनाथ मसुरकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच संयोजन व संकल्पना कोमसाप शाखा मालवणचे सुरेश ठाकूर व गुरुनाथ ताम्हणकर यांची होती. महेश बागवे यांनी या काव्यउपक्रमाच कौतुक करत असे साहित्यिक उपक्रम ग्रामीण भागातही होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. यावेळी बालगटातून नेहा चिंदरकरने बाप,जयेश साटमने निसर्ग,नंदिनी मेस्त्री हिनेआई,पियुष भोगले याने गर्दीत माणसांच्या माणूस शोधत आहे,साक्षी वंजारे हिने सर आमचे गणिताचे..
स्वराली बागवे हिने सगळा कसा ok,
दीक्षा देवगडकर हिने परीक्षा, सायली गुरुदास परब हिने थोडं जगून बघ
तन्वी लाड हिने कोरोनातील शाळा,
संस्कृती मसुरकर हिने संघर्ष, केदार तांडेल याने आई, देवांश कबरे याने माझा पेवणा, मधुकर वाडकर याने माझा भारत देश, जागृती नावेलकर हिने बाप आणि मुलगी मधील नात,वैष्णवी सावंत हिने वेळ, पियुषी वाडकर हिने शाळा,नित्या लब्धे हिने ऋतू ,भूषण भोगले याने आमची शाळा, श्रिया परब हिने हे तर सारे निसर्गाचे देणे आदी कविता सादर केल्या. खुला गट मधून
मनाली फाटक यांनी आजचा श्रावण बाळ,
भूषण दत्तदास यांनी प्रेम कैसे हे जाणतो, सौरभ मुंडले याने चंद्रगौर,
विठ्ठल लाकम यांनी माका पोटात घे, विशाखा जाधव यांनी जागर , आर्या भोगले यांनी जात,
किशोर अर्जुन चव्हाण यांनी सोन्यासारखा संसार, सौ अर्चना उमेश कोदे यांनी विराणी,
भरत ठाकूर यांनी मी आजचा शिक्षक,मंदार सांबारी यांनी निसर्गा थोर तुझे उपकार,सिद्धेश हळबे यांनी होशील का माझी राणी आदी कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अर्चना कोदे व भरत ठाकूर यांनी केले. तर प्रास्ताविक व आभार सौ. वर्षाराणी बलवंत अभ्यंकर यांनी मानले.

प्रतिनिधी / कोकण नाऊ / मसुरे

error: Content is protected !!