एएलइ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने पाट हायस्कूलला दहा लॅपटॉप भेट .

प्रतिनिधी । कुडाळ : पाट हायस्कूलचे माजी विद्यार्थी ज्ञानेश सामंत यांनी विद्यालयाला भेट दिली. त्यावेळी प्रविण ठाकूर तसेच संस्था पदाधिकारी राजेश सामंत देवदत्त साळगावकर उपस्थित होते. ऑनलाईन कामकाजात वाढ झाल्यामुळे प्रत्येक परीक्षा, कार्यालयीन कामकाज ऑनलाईन करावी लागतात. त्यामुळे शाळेची गरज ओळखून ज्ञानेश सामंत यांनी विद्यालयाला दहा लॅपटॉप भेट दिले. यावेळी संपूर्ण शाळेचे पाहणी केली. शालेय विविध उपक्रमांची माहिती देवदत्त साळगावकर आणि पर्यवेक्षक राजन हंजनकर यांच्याकडून जाणून घेतली. यापुढेही आपण आवश्यक ती मदत विद्यालयाला करणार असल्याचे सांगीतले. यावेळी शिक्षक प्रातिनिधी संदीप साळसकर, शालेय कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. संस्था संचालक देवदत्त साळगावकर यांनी आभार मानले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!