‘जिव्हाळा’ मधील रुग्णांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

श्रीमती मनोरमा चौधरी ट्रस्ट आणि प्रगत सिंधुदुर्ग मुंबई यांचा उपक्रम
निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ माड्याचीवाडी-नेरुर येथील सुरेश बिर्जे जीवन आधार चँरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रम संस्थेमध्ये श्रीमती मनोरमा चौधरी ट्रस्ट आणि प्रगत सिंधुदुर्ग मुंबई यांच्या वतीने बेड रिटन रुग्णांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या रुग्णांसाठी आवश्यक असणारा वॉटरबेड, कपडे, व खाऊ अशा जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. या संस्था समाजातील निराधार, अनाथ, विकलांग अशा घटकांसाठी काम करणारणाऱ्या संस्था असून गरीब, होतकरू विद्यार्थ्यांनासुद्धा आधार देण्याचे काम करतात.
यावेळी श्रीमती मनोरमा चौधरी चँरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी, सचिव संदीप साळसकर,आश्रमाचे संचालक प्रसाद पोईपकर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख श्रीमती वर्षा कुडाळकर, बंटी तुळसकर, जिव्हाळा संस्थेचे संस्थापक सुरेश बिरजे उपस्थित होते. संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या ९ नोव्हेंबरच्या “मोफत आरोग्य तपासणी शिबीरासाठी” श्री. चौधरी यांनी आपल्या संस्थेतर्फे रु. ५०००/- मदत जाहीर केली. यावेळी आश्रमाच्या संचालक मंडळातील,सल्लागार समिती मधील सदस्य त्याचप्रमाणे लाभार्थी उपस्थित होते. यावेळी स्वागत, प्रास्तविक प्रसाद मधुकर पोईपकर यांनी केले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.