बीडीओ विजय चव्हाण यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, सरपंच, ग्रामसेवक यांनी दिल्या शुभेच्छा
निलेश जोशी । कुडाळ : गटविकास अधिकारी विजय चव्हाण आपण या महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होत आहात. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंटवर भर द्या. तुमची एनर्जी वाखाखण्याजोगी असून मी आपल्याकडून भरपूर काही शिकले, तुमच्यामध्ये असलेले गुण माझ्या अंगी यावेत असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला यांनी केले. शुभेच्छाच्या वर्षावात विविध विभागांच्या वतीने गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांचा वाढदिवस सोहळा ५८ गुलाबांनी सजविलेला ५.८ किलोचा केक कापून साजरा करण्यात आला.
कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या ५८ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंचायत समितीच्या विविध विभागाच्या वतीने त्यांचा दिमाखात वाढदिवस साजरा करण्यात आला हा वाढदिवस सोहळा पंचायत समिती सभागृहात व महालक्ष्मी सभागृहात विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी विविध समाज संघटना मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
तहसीलदार अमोल पाठक, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, माजी सरपंच दादा साईल, सरपंच राजन परब, अजय आकेरकर, आर डी जंगले, संजय ओरोसकर, गणेश राठोड, एकात्मिक प्रकल्प अधिकारी गीता चेदवणकर, ग्रामसेवक संघटना अध्यक्ष सोनाली पालव, रांगणातुळसुळी माजी सरपंच नागेश आईर, कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, वासुदेव कसालकर, स्वप्ना मस्के, सरिता धामापूरकर, चेतना म्हाडगुत, बाळकृष्ण परब, के टी चव्हाण, सरपंच कावेरी चव्हाण, रामदास चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, ग्रामसेवक संघटना, सरपंच संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी अंगणवाडी सेविका, आशा मदतनीस, उमेद, महसूल प्रशासन, विविध शिक्षक संघटना पदाधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी पोलीस निरीक्षक श्रीमती मुल्ला यांनी सांगितले की सर्व क्षेत्रात विजय चव्हाण यांचा प्रचंड हातखंडा आहे एवढ्या मोठ्या पदावर असताना कोणताही आव न आणता त्यांची सर्वसमावेशकता उल्लेखनीय आहे असे सांगितले
दादा साईल म्हणाले गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी कुडाळ तालुक्यात गेली सहा साडे सहा वर्षात सर्वागीण विकासाची घोडदौड कायम ठेवली आहे. माझ्या सरपंच कालावधीत आमच्यासाठी ते आयडॉल होते. त्यांनी आपल्या कुडाळ तालुक्याला नेहमीच शासनाच्या सर्वच योजनांत राज्यपातळीवर अव्वलस्थानी नेले ही त्यांची घोडदौड कोणी थांबवू शकला नाही. ते आता ३१ ऑक्टोबरला सेवानिवृत्त होत आहेत. कुडाळ पंचायत समितीच्या विकासात त्यांची पोकळी ही नेहमीच जाणवणार आहे. त्यांच्यासारखा विकासाचा महामंत्र घेऊन जाणारा गटविकास अधिकारी भविष्यात मिळणे कठीण आहे असे सांगितले.
हा एक कौटूबिक सोहळा – विजय चव्हाण
आज माझा वाढदिवस कुडाळ तालुक्याने दिमाखात साजरा केला हा वाढदिवस म्हणजे एक कौटूबिक सोहळा आहे माझी पंचायत समितीसह कुडाळ तालुक्यातील सर्व जनता माझे कुटुंब आहे तुमच्या प्रेमाच्या शुभेच्छानी मी भारावून गेलो आहे माझी कर्मभूमी माझा कुडाळ तालुका असल्याने मी जरी सेवानिृवृत्त झालो तरी कुडाळ तालुक्याच्या विकासासाठी माझे निश्चितच सहकार्य असणार असल्याचे सांगितले
सूत्रसंचालन प्रफुल्ल वालावलकर यांनी केले यावेळी सतीश साळगावकर श्रीमती आडेलकर यांनी कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.