भाजपा मच्छीमार सेल जिल्हा संयोजक पदी विकी तोरसकर

मालवण भाजपा मच्छीमार सेल सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी विकी. तोरसकर यांची नियुक्ती झाली आहे. जिल्हाध्यक्ष श्री.प्रभाकर सावंत यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.सिंधुदुर्गातील तीन सागरी तालुके,त्याचबरोबर जिल्ह्यातील खाडी व नदी क्षेत्रातील मच्छीमार आणि मत्स्यव्यवसाईक यांच्यासाठी भाजपा मच्छीमार सेल कार्यरत आहे.
मत्स्य व्यवसायाला परप्रांतीय अनधिकृत मासेमारी,डिझेल कोटा,एनसीडीसी थकित कर्जे,सुसज्ज् बंदरे नसणे,सरकारी योजना मधील त्रुटी,अपुऱ्या नागरी सोयी सुविधा अश्या अनेक विविध समस्या भेडसावत आहेत.भाजपा मच्छीमार सेल च्या माध्यमातून सदर समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.तसेच जिल्ह्यात नव्याने उभारी घेणाऱ्या मत्स्यपालन क्षेत्राला उभारी देण्यासाठी विशेष प्रयत्न मा.पालकमंत्री आणि स्वतः मस्त्य शेतकरी असलेले श्री.रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे.
मत्स्य व्यवसाय वर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र अंमलबजणी कक्ष स्थापन करणे आणि पंतप्रधान मत्स्य संपदा योजना अंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थी यांना लाभ मिळवुन देणे आणि मच्छीमार महिला सक्षमीकरण ही प्रमुख उदीष्ट डोळ्यासमोर ठेऊन कार्यरत राहणार आहे.त्याचबरोबर मच्छीमार पट्ट्यामध्ये भाजपा संघटना वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार आहे.
भाजपा मच्छीमार सेल सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी नियुक्ती केल्याबद्दल. तोरसकर यांनी जिल्हाध्यक्ष,मा.पालकमंत्री,मा.केंद्रीय मंत्री श्री.नारायण राणे आमदार.श्री.नितेश राणे, माजी खासदार श्री.निलेश राणे, माजी जिल्ाध्यक्ष श्री.राजन तेली,भाजपा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, श्री.अतुलजी काळसेकर यांचे आभार मानले आहे





