वागदेत कार अपघातात एक जण जखमी

अपघातात कारचे मोठे नुकसान

कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या चार चाकी वरील नियंत्रण सुटल्याने कार वागदे गणपती मंदिरा नजिक महामार्ग खाली जाऊन अपघात झाला. हा अपघात आज शुक्रवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून, अपघातानंतर चालकाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच माजी सरपंच रुपेश आंमडोसकर यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!