कुडाळमध्ये उद्या (१२) रक्तदान शिबीर

प्रतिनिधी । कुडाळ : ग्रामीण रुग्णालय कुडाळ आणि महिला बाल रुग्णालय कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्यमान भारत अंतर्गत जिल्हा रक्तपेढी ओरोस यांच्या सहकार्याने लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदूर्ग मार्फत उद्या गुरुवारी १२ ऑक्टोबरला सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत महिला बाल रुग्णालय कुडाळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
या शिबिराला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, जिल्हा रक्तपेढी संक्रमण अधिकारी डॉ अमित आवळे, जिल्हा रुग्णालयाचे आरएमओ डॉ सुबोध इंगळे, कुडाळ ग्रामीण रुग्णालय वैदयकिय अधिक्षक डॉ प्राची तनपूरे, महिला बाल रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ अनिल पवार, लायन्स क्लब कुडाळ अध्यक्ष सौ जयंती कुलकर्णी,सचिव सौ स्नेहा नाईक, खजिनदार आनंद बांदिवडेकर, सीए सुनील सौदागर, श्रीनिवास नाईक, लायन्स पदाधिकारी डॉक्टर्स आदी उपस्थित राहणार आहेत. शिबिराचा शुभारंभ डॉ प्राची तनपुरे यांच्या रक्तदान शिबिराने होणार आहे. या सामाजिक उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ तनपुरे, सीए सौ कुलकर्णी यांनी केले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.