कुडाळ तालुक्यातील चार बस स्थानकांचे मूल्यांकन

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानांला सुरुवात

प्रतिनिधी । कुडाळ : हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत कुडाळ तालुक्यातील चार एसटी बस स्थानकांचे मूल्यांकन करण्यात आले.
हिंदुरहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानाला सुरुवात झाली आहे. या अभियानांतर्गत बस स्थानकांचे मूल्यांकन केले जाते आणि या मूल्यांकनानुसार क्रमांक देऊन पारितोषिक दिले जाते. दरम्यान कुडाळ तालुक्यामध्ये कुडाळ जुने एस. टी. बस स्थानक, कुडाळ नवीन एस. टी. बस स्थानक, कसाल एस. टी. बस स्थानक, ओरोस एस टी बस स्थानक यांचे मूल्यांकन करण्यात आले.
या मूल्यांकन समितीमध्ये कोल्हापूर विभाग नियंत्रक सौ. अनघा बारटक्के, कोल्हापूर उपयंत्र अभियंता सौ. सुकन्या मानकर, कोल्हापूर कामगार अधिकारी, संदिप भोसले, पत्रकार विलास कुडाळकर, प्रवाशी मित्र सौरभ पाटकर यांचा समावेश होता. तर यावेळी सिंधुदुर्ग विभागीय वाहतूक अधिकारी डॉ. विक्रम देशमुख, कुडाळ आगार व्यवस्थापक संदिप पाटील, कुडाळ आगारचे सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक सुरेंद्र मोरजकर उपस्थित होते. या मूल्यांकनाची सुरुवात ओरोस एस. टी. बस स्थानकापासून करण्यात आली.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!