कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकपदी डॉ. प्राची तनपुरे

१४ ऑक्टोबर रोजी कुडाळ येथे आयुष्यमान अंतर्गत महाआरोग्य शिबिराचे आयोजन
निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ ग्रामीण रुग्णालय वैद्यकिय अधिक्षकपदाचा कार्यभार डॉ प्राची तनपूरे यांनी स्वीकारला आहे. येत्या 14 ऑक्टोबरला ग्रामीण रुग्णालय कुडाळ येथे आयुष्यमान अंतर्गत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. गरजूनी या शिबिराचा लाभ घ्या असे आवाहन डॉ. तनपुरे यांनी केले आहे.
डॉ तनपुरे यांनी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर हे महाआरोग्य शिबीर होत आहे गेले काही महिने हे पद रिक्त होते त्यांच्याकडे जबाबदारी आल्यानंतर त्यांनी रुग्णांना अधिकाधिक सेवा कशी देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. डॉ तनपुरे या लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदूर्ग या सेवाभावी संस्थेच्या सभासद आहेत. आयुष्यमान भव अंतर्गत ज्या ज्या आरोग्यसेवा देता येईल त्या आम्ही देणार आहोत असे सागितले.
दरम्यान 14 ऑक्टोबरला आयुष्यमान भव अंतर्गत महाआरोग्य शिबिराचे आयोजन ग्रामीण रुग्णालय कुडाळ येथे करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी 9ते सायंकाळी 4 या वेळेत होणार आहे. या शिबिरात स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, कान नाक घसा तज्ञ ,नेत्रतज्ञ ,दंततज्ञ, योग, आहार तज्ञ आदी सर्व विभागाचे डॉक्टर्स उपस्थित राहून उपचार व मार्गदर्शन करणार आहेत. रुग्णांनी सोबत येताना आधारकार्ड रेशन कार्ड व आधारकार्डला लिंक असणारा मोबाईल आणावा असे आवाहन डॉ तनपुरे यांनी केले आहे.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.