मुलुंड येथे वैश्यवाणी वधुवर परिचय मेळावा

सहभागी होण्यासाठी आवाहन

ब्युरो न्यूज । सिंधुदुर्ग : वैश्यज्ञाती विकास मंडळ- मुलुंड, मुंबई यांच्या वतीने वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन  रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी संध्याकाळी ०४ वाजता ज्येष्ठ नागरीक संघ-विरंगुळा केंद्र, सी.डी. देखमूख गार्डन जवळ, मुलुंड (पूर्व) येथे केले आहे. वैश्य समाजातील वधू आणि वर यांना विवाह जमण्याची कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी यामाध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत.
कोकणातील इच्छुक वधू वरांना प्रत्येकी रू. २५०/- भरून नोंदणी करता येईल. मेळाव्यात वधू वरांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे आवाहन सचिव विजय केसरकर यांनी केले आहे.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.

error: Content is protected !!