जोरदार घोषणाबाजी व मोठ्या उत्साहात “शिवशौर्य यात्रेचे” कणकवलीत स्वागत

आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

“हिंदुस्तान में रहना होगा, वंदे मातरम बोलना होगा” च्या घोषणानी परिसर सोडला दुमदुमून

हिंदूंना एकवटण्यासाठी बजरंग दलाचे कार्य कौतुकास्पद: नितेश राणे.

कणकवली/दिगंबर वालावलकर.

शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण व विश्व हिंदू परिषद च्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त बजरंग दल कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शिवशौर्य यात्रेला कणकवलीत उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने कणकवलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या छत्रपतींच्या पुतळ्याच्या परिसराला पुष्पहार घालून सजविण्यात आले होते. यावेळी आमदार नितेश राणे यांनी शिव शौर्य यात्रेचे स्वागत केले. आमदार नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात या यात्रेचे स्वागत केले. शिव शौर्य यात्रेचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेला रथ या चौकात दाखल झाल्यानंतर छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. बजरंग दलाच्या वतीने कोकण प्रांतात आयोजित केलेली ही शिव शौर्य यात्रा ही महाराजांचा इतिहास जाज्वल्य करणारी असून हिंदूंना एकवटण्यासाठी बजरंग दलाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे उद्गार श्री. राणे यांनी याप्रसंगी काढले. त्यानंतर ही शिवशौर्य यात्रा रत्नागिरी च्या दिशेने मार्गस्थ झाली. त्यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, भाजपा विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवन, कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माझी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, संदीप साटम, राजश्री धुमाळे, मेघा गांगण, सरपंच संदीप मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, समीर प्रभूगावकर, संतोष पुजारे, जिल्हा बँक संचालक समीर सावंत, संतोष पुजारे, बजरंग दलाचे अखिल आजगावकर, प्रसाद ठाकुर, दिनेश सरूडकर, परेश सावंत, निकेतन राणे, आदि उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या.

error: Content is protected !!