करूळ येथील रामेश्वर सोसायटीला अ वर्ग दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार!

वार्षिक सर्वसाधारण बैठकीत चेअरमन वसंत उर्फ आण्णा तेंडुलकर यांची माहिती
सभासदांना 8 टक्के लाभांशाचे वाटप
करूळ रामेश्वर सोसायटी येथील संस्थेने केलेली काम हे सर्वांसमोर असून, संस्थेच्या यशस्वी वाटचालीमुळे संस्था सभासदांना 8 टक्के लाभांश देण्यात आला. संस्था अ वर्ग मध्ये आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहणार आहेत असे प्रतिपादन श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी चे चेअरमन वसंत उर्फ अण्णा तेंडुलकर यांनी केले. श्री रामेश्वर सोसायटीची करूळ ची वार्षिक सर्वसाधारण सभा येथील सभागृहात घेण्यात आली. सभेच्या सुरुवातीला दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संस्थेचे चेअरमन वसंत उर्फ आण्णा तेंडुलकर, व्हाईस चेअरमन रवींद्र फोपे, महेश पांचाळ, यशवंत चाळके, सहदेव केसरकर, संध्या आचार्य, सविता ठाकूर, गटसचिव कमलाकर डगरे आदि उपस्थित होते. सभेचे नियमित कामकाज झाल्यानंतर सभासदांशी चर्चा करण्यात आली. या सभेला करूळ, हुबरट, कोंडये, येथील येथील 90 सभासद उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन मंगेश कर्णिक यांनी केले.
दिगंबर वालावलकर/ कणकवली