युवासेनेच्या माध्यमातून साकेडी मधील स्ट्रीट लाईटचे बल्ब बदलले!

गणेशोत्सव च्या कालावधीत रस्ता निघणार उजळुन

युवासेना विभाग प्रमुख किरण वर्दम यांचा पुढाकार

खासदार विनायक राऊत यांच्या खासदार निधीच्या माध्यमातून 4 वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या साकेडी फौजदारवाडी, तांबळवाडी ते बौद्धवाडी पर्यंतच्या स्ट्रीट लाईटचे बल्ब युवासेनेच्या माध्यमातून आज गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदलण्यात आले. युवासेना विभाग प्रमुख किरण वर्दम यांनी याकरिता पुढाकार घेत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे काम करून घेतले. गणेशोत्सव कालावधीत गावामध्ये असणारी वर्दळ व आरती, भजनासाठी गणेश भक्तांची असणारी रहदारी विचारात घेत हे बल्प बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. ही स्ट्रीट लाईट ग्रामपंचायतच्या ताब्यात नसून युवासेनेने याकरिता पुढाकार घेत किरण वर्दम यांनी याबाबतचे काम आज करून घेतले. यामुळे साकेडी तांबळवाडी ते राजू राणे घरापर्यंत चा रस्त्याचा परिसर गणेश चतुर्थीच्या कालावधीत उजळुन निघणार आहे. हे बल्प बदलून घेत असताना तारांवर वाढलेली झाडी व वेली देखील साफ करून घेण्यात आल्या. श्री वर्दम यांनी हे काम करून घेतल्याबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. युवा सेनेच्या माध्यमातून श्री वर्दम यांनी पुढाकार घेत हे काम केल्याने ऐन गणेश चतुर्थीच्या कालावधीत गणेश भक्तांकडून देखील समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आज रविवारी सकाळी या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यांच्यासोबत आदेश सावंत व अन्य उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!