शिडवणे तंटामुक्ती अध्यक्षपदी महेंद्र टक्के यांची निवड
खारेपाटण : शिडवणे ग्रामपंचायतची ग्रामसभा नुकतीच संपन्न झाली.विविध विषयांवर या सभेत चर्चा विचार विनिमय करण्यात आला.याच ग्रामसभेत शिडवणे तंटामुक्ती अध्यक्ष पदाची नेमणूक करण्यात आली. महेंद्र टक्के यांची सर्वानुमते तंटामुक्त अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
त्यावेळी माजी वित्त बांधकाम सभापती रविंद्र जठार , सरपंच रविंद्र शेट्ये , उपसरपंच दिपक पाटणकर , सदस्य दयानंद कुडतरकर , सुप्रिया पाष्टे , कोमल शेट्ये , शांताराम धुमाळ , सुप्रिया पांचाळ , बंडू कोकाटे , पोलीस पाटील समीर कुडतरकर , माजी उपसरपंच अनिल पांचाळ , ग्रामसेवक नलावडे , मुख्याध्यापक प्रशांत कुडतरकर , उपशिक्षक प्रवीण कुबल , कृषी सहाय्यक राणे आणि बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत शिडवणे यांच्या वतीने महेंद्र टक्के यांचे अभिनंदन करण्यात आले. महेंद्र टक्के हे एक सामाजिक कार्यकर्ते असून माऊली वारकरी संप्रदाय मंडळ शिडवणे या मंडळाचे ते विद्यमान कार्याध्यक्ष आहेत. तंटामुक्ती अध्यक्ष निवड झाल्याबद्दल त्यांचे सगळीकडे कौतुक होत आहे.
अस्मिता गिडाळे,कोकण नाऊ / खारेपाटण