हळबे महाविद्यालयातील गाथाडे व ठाकूरमुंबई विद्यापीठाच्या पुरस्काराचे मानकरी

दोडामार्ग l प्रतिनिधी
येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यातील प्राध्यापक प्रज्ञाकुमार गाथाडे व मुख्य लिपिक योगेश ठाकूर यांना मुंबई विद्यापीठाचे अनुक्रमे आदर्श प्राध्यापक व आदर्श कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आले. दोन्ही कर्मचारी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून कार्यरत आहेत. महाविद्यालयाच्या जडणघडणीचे ते साक्षीदार आहेत.
मुंबई विद्यापीठाने गठीत केलेल्या समितीने त्यांच्या नावाची शिफारस केली होती. त्याला अनुसरून 5 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई विद्यापीठाच्या फिरोज शहा मेहता भवनमध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, माजी कुलगुरू सुहास पेडणेकर व सहायक कुलगुरू अजय भामरे यांच्या हस्ते दोघांनाही हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत उपस्थित होते.पाच हजार रुपये रोख, मानपत्र,स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
या यशाबद्दल शिक्षक आमदार कपिल पाटील, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक बेलसरे, चेअरमन अभिजीत हेगशेटये,कोषाध्यक्ष शरद कदम व माजी अध्यक्ष श्रीपाद हळबे यांनीही या दोघांचे अभिनंदन केले. महाविद्यालयास विद्यापीठातील एनएसएस विभागाने बेस्ट कॉलेज, बेस्ट प्रोग्राम ऑफिसर व बेस्ट स्टुडन्ट हे पुरस्कार देऊन गौरव केला होता.





