रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा

विविध उपक्रमांची दिली माहिती
शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलने, रोटरी इंडिया लीट्रसी मिशन अंतर्गत ” नेशन बिल्डर अवॉर्ड ” हा कार्यक्रम ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडीयल विद्यालय, वरवडे येथे यशस्वी रीत्या पार पडला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, रोटरी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी मेडिकल कॅम्पस व रोटरी क्लब ऑफ कणकवलीचे अध्यक्ष रोटेरीयन शंकर परब उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटे. राजेश कदम यांनी केले त्यात त्यांनी रोटरी इंडिया लीट्रसी मिशन विषयी सर्व उपस्थित मान्यवरांना माहिती दिली. लिटरसी उपक्रमा अंतर्गत
T-Teacher Support
E-E-Learning
A-Adult Literacy
C-Child Development
H-Happy School
रोटरीने केलेल्या विविध कामांची माहिती दिली.
या विशेष कार्यक्रमात विविध शाळेतील, कॉलेजातील 7 उपक्रमशील शिक्षक, प्रोफेसर यांचा प्रातिनिधिक स्वरूपात शाल श्रीफळ व सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. वामन तर्फे – शिरवंडे हायस्कूल शिरवंडे, पी जे कांबळे- विद्यामंदिर हायस्कूल कणकवली, सौ मयुरी राणे – जिल्हा परिषद शाळा, रेंबवली, सौ श्वेता गावडे – आयडीयल स्कूल, वरवडे, विजय रासम, फोंडाघाट हायस्कूल, डॉ. बी जी गावडे, कणकवली कॉलेज, प्रशांत अमृते, कणकवली कॉलेज
दोन्ही प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात शिक्षकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रोटे. राजेश कदम यांनी केले ,
कार्यक्रमाला रोटरी मधून श्री गुरु पावसकर – क्लब लीट्रसी हेड , श्री भेराराम राठोड , सौ उमा परब, उपस्थित होते .
तसेच आयडीयल स्कूल मधील संचालक व ज्येष्ठ शिक्षक श्री तानावडे सर, संचालक श्री बुलंद पटेल, सौ अर्चना देसाई मुख्याध्यापक व शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते . शाळेतर्फे श्री तानावडे सर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कणकवली प्रतिनिधी





