मारहाण प्रकरणी पुराव्या अभावी संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता

संशयित आरोपीच्या वतीने ऍड. विलास परब, तुषार परब यांचा युक्तिवाद
खारेपाटण संभाजीनगर येथे उभ्या असलेल्या प्रकाश चव्हाण यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी आरोपी विरोधात सबळ पुरावा न आल्याने पुराव्या अभावी संशयित आरोपी अविनाश गुरव याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कणकवली न्यायाधीश एम बी सोनटक्के यांनी याबाबतचा निर्णय दिला. संशयित आरोपीच्या वतीने ऍड. विलास परब, ऍड. तुषार परब यांनी काम पाहिले. 6 एप्रिल 2020 रोजी फिर्यादी हे खारेपाटण संभाजीनगर येथे उभे असताना आरोपी अविनाश मधुकर गुरव हे तिथे आले. व त्यांनी फिर्यादीला उभे राहण्याचे कारण विचारून शिवीगाळ करून हातावर व पाठीवर मारहाण करत दुखापत केली अशी फिर्याद प्रकाश चव्हाण यांनी दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र संपूर्ण केस मध्ये आरोपी विरुद्ध सबळ पुरावा न मिळाल्याने व केस मध्ये संशय निर्माण झाल्याने पुराव्या अभावी अविनाश गुरव याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
कणकवली/ प्रतिनिधी