कलमठ मधील वीज समस्या प्रश्नी युवासेनेची महावितरण वर धडक

लवकरच समस्या सोडवण्याचे कार्यकारी अभियंत्यांचे आश्वासन

वारंवार अर्ज देऊनही विजेचा समस्या ची पूर्तता होत नसल्याने आज शिवसेना-युवासेना कलमठ ची MSEB ला धडक दिली.
गणपती आणि गोपाळकाला आणि त्या नंतर सुरू होणारे सण यांच्या अनुषंगाने विजेचे होणारा नेहमीचा तूटवडा थांबवण्यात यावा यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे सुचविले असता
लवकरच कलमठ गावासाठी येणाऱ्या विजेचा सर्व समस्या दूर होतील असे आश्वासन कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी दिले.
तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांचा शिफारशीनुसार मंजुर झालेल्या ट्रान्सफॉर्मर लवकरच कलमठ बिडयेवाडी मध्ये चालू करू असेही आश्वासन दिले.
यावेळी श्री सुशांत नाईक(युवासेना जिल्हाप्रमुख सिंधुदुर्ग) श्री अनुप वारंग (कलमठ विभाग प्रमुख) श्री धिरज मेस्त्री (कलमठ युवासेना शहरप्रमुख) श्री.सचिन खोचरे(ग्रामपंचायत सदस्य) श्री. नितेश भोगले(कणकवली तालुका संघटक) श्री. निसार शेख(माझी सरपंच) श्री. विलास गुडेकर आदी उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!