आयडियल प्रशालेच्या उपक्रमशील शिक्षिका श्वेता गावडे यांना “नेशन बिल्डर अवॉर्डने” सन्मानित.

रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांसकडून पुरस्काराचे वितरण.
कणकवली/मयुर ठाकूर.
आयडियल प्रशालेच्या उपक्रमशील शिक्षिका श्वेता गावडे यांना “नेशन बिल्डर अवॉर्ड” प्राप्त झाला आहे.हा पुरस्कार रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांस कडून वितरित करण्यात आला.ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स यां प्रशालेत हा पुरस्कार वितरण सोहळा रोटरीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
श्वेता गावडे या आयडियल प्रशालेत गेली कित्येक वर्ष शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.त्यांचे उपक्रम हे नेहमीच विद्यार्थ्यांना नवीन दिशा आणि संजीवनी देणारे ठरतात.श्वेता गावडे या जिल्ह्यातील प्रसिद्ध योगशिक्षक असून योगा कोच म्हणून देखील जिल्हा तसेच राज्यभरात त्यांनी काम पाहिले आहॆ.तसेच कोविडकाळात अनेकांना मोफत योगा मार्गदर्शन देखील त्यांनी केलेले आहे. कित्येक काव्यवाचन स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग असतो.गावागावात असणाऱ्या बचत गटांमधील महिलांना देखील योगाचे मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी करण्यात येत.जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये देखील त्यांची योगाची प्रशिक्षण होत असतात.विविध शाळा, कॉलेज,विविध संस्थांच्या माध्यमातून योग शिबिर त्या राबवत असतात. योगाचे महत्व समाजाला पटवून देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण देऊन कित्येक विद्यार्थ्यांना दरवर्षी त्या राज्यस्तरापर्यंत योग स्पर्धांमध्ये घेऊन जातात.आयडियल प्रशालेत राबविल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांमध्ये त्या हिरहीरीने भाग घेऊन उपक्रम यशस्वी करण्यासाठी कायमच मेहनत घेतात.समाज्यात त्या करीत असलेलं कार्य हे उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहॆ.आणि याच कार्याची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ सेंट्रल यांस कडून “नेशन बिल्डर अवॉर्ड” देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.हा अवॉर्ड तालुक्यातील निवडक नवरत्नांना देण्यात आला आणि त्यामध्ये आयडियल प्रशालेच्या शिक्षिकेचा सहभाग असल्यामुळे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ विद्याधर तायशेटे, कार्याध्यक्ष बुलंद पटेल,सचिव हरिभाऊ भिसे,सहसचिव महेंद्रकर, मुख्याध्यापिका अर्चना देसाई यास कडून सौ.श्वेता गावडे यांच्यावर अभिनंदना वर्षाव होत आहे.तसेच त्यांचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.