आयडियल प्रशालेत शिक्षक दिन उत्साहात साजरा.

कणकवली/मयुर ठाकूर.

माणसाला आयुष्यात यशाच्या शिखरावर नेणारा शिक्षकच असतो. शिक्षकाच्या आशीर्वादानेच आपण अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटचाल करतो.म्हणून 5 सप्टेंबरचा दिवस भारतात ‘शिक्षक दिन’ (Teachers Day) म्हणून साजरा केला जातो.या दिवशी, विद्यार्थी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात.
ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स वरवडे येथे देखील शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.येथील विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी विविध उपक्रम राबवित हा दिवस एका सोहळ्यासारखा साजरा केला.प्रसंगी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांच सादरीकरण केलं आणि आपल्या गुरुवर्यांना गुरुवंदना दिली.

error: Content is protected !!