साकेडी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी राजु सदडेकर

निवडी बद्दल सर्वच स्तरातून केले जातेय अभिनंदन
साकेडी गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी कृष्णा विठ्ठल उर्फ राजू सदडेकर यांची एक मताने निवड करण्यात आली. साकेडी ग्रामपंचायतची ग्रामसभा आज मंगळवारी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. या प्रसंगी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती गठित करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी सदडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. श्री. सदडेकर हे साकेडी सोसायटीच्या संचालक पदी कार्यरत असून त्यांच्या या अध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
कणकवली / प्रतिनिधी





