मसुरे गडगेरा वाडीतील १० वर्षे ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंग चा प्रश्न दत्ता सामंत यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सोडविला….

अडीच लाख रुपयांचा निधी स्वतःच्या खिशातून त्वरित देणारा दत्ता सामान खरा देवदूत ….
मसुरे ग्रामस्थांची भावना
गेली दहा वर्षे मसुरे गडघेरावाडी दत्त मंदिर येथील प्रलंबित असलेला ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंग चा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे नेते दत्ता सामंत यांनी पहिल्याच भेटीदरम्यान त्वरित दूर केला असून येथील ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यासाठी दत्ता सामंत यांनी स्वतः सुमारे अडीच लाख रुपये स्वतः खर्च करून वीज वितरण च्या ठेकेदारास येथील ग्रामस्थांचा ट्रांसफार्मर शिफ्टिंगचा प्रश्न येत्या गणेश चतुर्थी पूर्वी सोडविण्यास सांगितले. गेली दहा वर्षे येथील ग्रामस्थांनी आमदार खासदार प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही हा प्रश्न सुटत नव्हता. यासाठी येथील ग्रामस्थांच्या वतीने माझी जि प अध्यक्ष सरोज परब,शिवाजी परब, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, महेश बागवे, माझी पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर तसेच स्थानिक ग्रामस्थांनी दत्ता सामंत यांचे लक्ष वेधले होते. यावेळी मसुरे भेटी दरम्यान दत्ता सामंत यांनी या ट्रांसफार्मर ची पाहणी करून या प्रश्नासाठी लागणारा अडीच लाख रुपयांचा निधी स्वखर्चातून संबंधित ठेकेदारास देऊन हे काम येत्या गणेश चतुर्थी पूर्वी पूर्ण करून देण्याचे सांगितले. एखाद्या देवदूताप्रमाणे दत्ता सामंत यांनी एका शब्दातच येथील वाडीचा गेली कित्येक वर्ष प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडविल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी दत्ता सामंत आणि भारतीय जनता पक्षाचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले.
यावेळी स्थानिक ग्रामस्थांच्या समोरच दत्ता सामंत यांनी ठेकेदारास पैसे सुपूर्द केले. संबंधित ठेकेदाराने येत्या काही दिवसात हे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी दत्ता सामंत यांच्यासोबत भटक्या विमुक्त जाती चे जिल्हा पदाधिकारी बाळा गोसावी, माजी नगरसेवक दीपक पाटकर, भाई मांजरेकर, सरोज परब, शिवाजी परब, महेश बागवे, संतोष पालव, जगदीश चव्हाण, प्रमोद बागवे, सुरेश शिंगरे, हिरबा तोंडवळकर, संकेत परब, श्री लक्ष्मण शिंगरे, श्री इशू तोंडवळकर, छोटू ठाकूर,
पुरुषोत्तम शिंगरे,
श्री मेस्त्री,तात्या हिंदळेकर, अना भोगले, श्री सावंत,श्री शिंगरे, श्री तोंडवळकर आणि स्थानिक ग्रामस्थ व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते..
मसुरे प्रतिनिधी