सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान चा आदर्श शिक्षक पुरस्कार तेजस बांदिवडेकर याना जाहीर

26 नोव्हेंबर रोजी होणार पुरस्कार वितरण

कणकवली/मयुर ठाकूर

सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान , कणकवली यांचा 2023 चा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वजराट जिल्हा परिषद शाळा येथील उपशिक्षक श्री तेजस विश्वनाथ बांदिवडेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. श्री. तेजस बांदिवडेकर यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण भागातील मुलांना विक्रमी यश मिळवून देवून अध्यापनाचा नवीन पायंडा निर्माण केला आहे. सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम पाच हजार रुपये असे पुरस्कार स्वरूप आहे..या पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून याआधी आदर्श शिक्षक प्रफुल्ल जाधव आणि प्रतिभा कोतवाल यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. सदर पुरस्कार 26 नोव्हेंबर 2023 या सदाशिव पवार गुरुजी यांच्या मातोश्री सरस्वती लक्ष्मण पवार यांच्या स्मृतिदिनी कणकवली इथे समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती प्रतिष्ठान च्या अध्यक्ष शुभांगी पवार यांनी दिली

error: Content is protected !!