थोरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करा – सुनील पवार

श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती मुंबई यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप

प्रतिनिधी । कुडाळ : स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना जिद्द चिकाटी मेहनत व आत्मविश्वासाच्या जोरावर आपण त्या त्या क्षेत्रात पावले टाकली पाहिजेत. थोरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजात वावरले पाहिजे असे प्रतिपादन श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती रायगड अध्यक्ष सुनिल पवार यांनी आज मुलांना शालेय साहित्य वाटप प्रसंगी पिंगुळी येथे केले
पिंगुळी चिंदरकरवाडी येथे स्नेहलता सेवा सदन हे मुलीचे वसतिगृह आहे या ठिकाणी पालघर व कणकवली येथील मुली राहून जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना संस्थेच्या अध्यक्ष किशोरी कोळेकर यांचे बहुमोल सहकार्य मार्गदर्शन लाभत आहे. आज या सर्व मुलींना श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती मुंबई यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते उद्योजक सुनील पवार यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम वसतिगृहात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी सौ वैशाली पवार, संस्थेच्या अध्यक्ष किशोरी कोळेकर, पत्रकार अजय सावंत, कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत, ओंकार सावंत, अमित राणे, वैशाली भावर, रोशनी घोडी, नमिता चिमड़ा, कल्याणी  कावले,  सेजल कावले, निकीता भावर, ज्योस्त्ना देवराम, कोम माया,  धोडी वसुंधरा, कडव, प्रिया घरट, तेजल कावले, पायल कडव, प्रतीक्षा वाडकर, अक्षदा धोडी, आदी उपस्थित होते.
श्री पवार म्हणाले तुम्ही सर्व मुली पालघर येथून शिकण्यासाठी सिंधुदूर्ग जिल्ह्यात आलात हे निश्चितच कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे तुम्हाला आशेचा किरण म्हणून संस्थेच्या अध्यक्ष किशोरी कोळेकर लाभल्या आहेत. संस्काराचे बाळकडू तुम्हाला त्या देत आहेत. त्यांचे मार्गदर्शन भविष्यात तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आपण समाजात वावरताना समाजाचे देणे लागतो ही भावना प्रत्येकाने जोपासली पाहिजे. भविष्यात तुम्ही मोठे झाल्यावर गरजूंना निश्चितच मदत करा. भविष्यात मोठे व्हा असे सांगत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या मातोश्री जिजाऊ यांनी जे संस्कार केले तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करा.   आज आपल्याला श्री उद्यान गणेश मंदिर सेवा समिती मुंबईच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आहे. असे सांगितले श्रीमती कोळेकर यांनी स्नेहलता सेवा सदन या मुलींच्या वसतिगृहाबाबत माहिती दिली.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!