सर्वांच्या सहकार्यातून संस्थेची सर्वसमावेशक प्रगती – राजाराम गव्हाणकर

सेवानिवृत्त आणि कार्यरत कर्मचारी सह पतसंस्था मर्या., सिंधुदुर्गची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा
प्रतिनिधी । कुडाळ : सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचारी सह पतसंस्थेचे खेळते भांडवल सध्या ३ कोटीच्या वर आहे. सिंधुदुर्ग बँकेकडून घेतलेले कॅश क्रेडीट कर्ज संस्थेने अल्पावधीतच निरंक केले आहे. त्यामुळे सध्या संस्था स्व-भांडवलावर आपल्या सर्वांच्या सहकार्यातून सर्वसमावेशक प्रगती करीत आहे. तसेच यावर्षी संख्येने सभासदाना ५ टक्के लाभांश देण्याचे ठरविले आहे.असे प्रतिपादन पतसंस्था अध्यक्ष राजाराम गव्हाणकर यांनी केले
सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचारी सह पतसंस्था मर्या., सिंधुदुर्ग पतसंस्थेची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा समाज सभागृह कुडाळ येथे संपन्न झाली. यावेळी पतसंस्था अध्यक्ष श्री. राजाराम गव्हाणकर, उपाध्यक्ष श्रीराम चव्हाण, सचिव चंद्रकांत परब, संचालक राजेंद्र वाडेकर, अंकुश गवस, नारायण सातार्डेकर, मनोहर सरमळकर, सखाराम सपकाळ , प्रकाश साळुंखे, सौ. प्रिया आजगावकर, व सौ. मंगला तेंडोलकर व्यासपिठावर उपस्थित होते.
दिपप्रज्वलन करून सभेचे उद्घाटन करण्यात आले. उपाध्यक्ष श्रीराम चव्हाण यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या केवळ २८ महिन्यांच्या अल्पावधितच संस्थेच्या झालेल्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती दिली. संस्था कोरोना महामारीच्या कालावधीत स्थापन होऊनही संस्थेचे ६०० पेक्षा जास्त सभासद झाले आहेत. सभासद वाढीचे प्रयत्न संचालक व कर्मचारी यांचे सातत्याने सुरू आहेत. त्याप्रमाणेच समेत उपस्थित असलेल्या सभासदानी सेवानिवृत्त व कार्यरत त्यांचे परिचयातील कर्मचाऱ्याशी संपर्क साधून संस्थेच्या सभासद वाढीस व आर्थिक उन्नतीस हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले. सचिव श्री. चंद्रकांत परब यांनी वार्षिक अहवाल वाचन केले.
तसेच संस्था अध्यक्ष श्री राजाराम गव्हाणकर यांनी संस्थेचे खेळते भांडवल सध्या ३ कोटीच्या वर आहे. सिंधुदुर्ग बँकेकडून घेतलेले कॅश क्रेडीट कर्ज संस्थेने अल्पावधितच निरंक केले आहे. त्यामुळे सध्या संस्था स्व-भांडवलावर आपल्या सर्वांच्या सहकार्यातून सर्वसमावेशक प्रगती करीत आहे. तसेच यावर्षी संख्येने सभासदाना ५ टक्के लाभांश देण्याचे ठरविले आहे.तसेच संस्थेने वसूल भाग भांडवल २६ लाखाच्यावर आहे. संस्थेकडील ठेवी २ कोटी ३५ लाख आहेत. विविध संस्थातील संस्थेची गुतवणूक १कोटी रु.ची केली आहे. याशिवाय सभासदांच्या गरजा भागविण्यासाठी २ कोटीच्यावर कर्ज वितरीत केले आहे. तसेच अभिमानाची गोष्ट म्हणजे सदर कर्जाचे सभासदाकडून नियमित कर्ज हप्तेफेड होत असल्याने मार्च २०२३ अखेर कर्ज थकबाकी शून्य राखली आहे. यास्तव या उल्लेखनीय कामगिरीमुळेच संस्थेस ‘अ’ वर्ग प्राप्त झाला आहे. सर्व कर्जदाराचे आभार व्यक्त केले. तसेच संस्थेस यापुढेही असेच सहकार्य करणेबाबत आवाहन केले. यावेळी सर्वांसाठी त्वरीत सोनेतारण कर्जाची सुविधा उपलब्ध असून सर्व सभासदांनी त्याचा लाभ घ्यावा व परिचयातील व्यक्तिनाही याबाबतची माहिती देऊन संस्थेच्या आर्थिक प्रगतीस सहकार्य करावे असे सांगीतले.
त्याचबरोबर संस्था कार्यालय हे लवकरात लवकर स्व-मालकिच्या जागेत सुरु करावयाचा संचालक मंडळाचा मानस आहे. त्यासाठीही सर्व सभासदांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याची विनंती केली.संस्था कार्यालयासाठी सदनिका खरेदी करण्याबाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी संस्थचे खर्डेकर कॉलेज में सभासद प्रा जयसिंग नाईक याची मुलगी ऐश्वर्या नाईक मुलगा राजवर्धन नाईक यांच्या mpsc परिक्षेतील यशाबद्दल संस्थेतर्फे पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना या संस्थेच्या वेळोवेळी मिळालेल्या तत्पर आर्थिक सहकार्यामुळेच माझी मुले यश मिळवू शकली या शब्दात संस्था अध्यक्ष संचालक मंडळ व कर्मचारी यांचे आभार मानले. यापुढेही या संस्थेची घौडदौड अविरतपणे सुरु राहावी अशा शुभेच्छा दिल्या. या सभेत संस्थेचे सभासद मोठया प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. मनोहर सरमळकर यांनी केले. व श्री. सखाराम सपकाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.