तेंडोली विविध क्षेत्रात आघाडीवर – बापू नाईक

श्री देव रवळनाथ मंदिरात आरती आणि नामस्मरण सप्ताह
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
प्रतिनिधी । कुडाळ : तेंडोली गावाला धार्मिक व निसर्गतेचा वारसा लाभला आहे. हा गाव कला क्रीडा कृषी क्षेत्रात आघाडीवर आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक बापू नाईक यांनी केले. तेंडोली येथील श्री देव रवळनाथ मंदिरात आरती व नामस्मरण सप्ताह सोहळ्याच्या निमित्तानं विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते याचा सत्कार सोहळा श्री देवी सातेरी मंदिराच्या रंगमंचावर पार पडला. त्यावेळी बापू नाईक बोलत होते.
यावेळी सरपंच अनघा तेंडोलकर, सौ प्रमिला नाईक, पत्रकार अजय सावंत, नयना नाईक, प्रसाद नाईक ,माजी सरपंच मंगेश प्रभू, संदेश प्रभू, तेंडोली हायस्कूल मुख्याध्यापक एस पी समुद्रे, शाम वालावलकर, चेतना वालावलकर, रमेश कुंभार, सूर्याजी नाईक, कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत, प्रमोद राऊळ, कांता राऊळ, स्वाती नाईक, गंगाराम परब, उमेश तेंडोलकर, बाळा साळसकर, किरण नाईक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते
ज्येष्ठ उद्योजक बापू नाईक म्हणाले श्री देव रवळनाथ मंदिरात 2002 ते 2023 पर्यंत दर सोमवारी आरती केली जाते यामध्ये कधीही खंड पडला नाही ही आरती सेवेकरी यांच्या सहकार्याने होत असते. सलग 21 वर्षे ही आरती सुरु आहे हे विशेष आहे. गावाच्या सर्वागीण विकासात सर्वाचे योगदान आहे. भविष्यातही गावाच्या विकासासाठी आम्ही कार्यरत राहू असे सागितले. तेडोली गाव सर्व बाबतीत आज विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. गावाच्या या विकासात बापू नाईक यांचे फार मोठे योगदान आहे, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय सावंत यांनी सांगितले.
सरपंच सौ तेंडोलकर श्री समुद्रे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा बापू नाईक कुटुबियांच्या वतीने शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. रमेश कुंभार यांचा घोगडी धोती देऊन विशेष सत्कार करण्यात आला. सुरुवातीला गावाच्या विकासात योगदान देणारे ज्येष्ठ उद्योजक यशवंत राऊळ व बाबा गावकर यांना आदराजली वाहण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात नृत्यांगना मृणाल सावंत हिने श्री देवी शारदेवर आधारित नृत्याने केली. तसेच नाट्यसंगीत व देशभक्ती गीतावर नृत्याविष्कार केला तिला बापू नाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या आरती व नामस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने गेले दोन दिवस मंदिरात विविध कार्यक्रम झाले. सूत्रसंचालन प्रमोद राऊळ यांनी केले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.