मराठा समाजाने संयम बाळगत महायुतीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा !

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे आवाहन
निलेश जोशी । कुडाळ : जालन्यातील दुर्दैवी घटनेबद्दल मी तातडीने प्रतिक्रिया देण टाळल कारण मराठा समाजाच्या आरक्षण चळवळीतील मी एक जबाबदार घटक आहे आणी त्याकडे राजकीय दृष्टिकोनातून मी पाहत नाही. मी स्वतः अनेक मराठा मान्यवरांसह सकल मराठा समाज मोर्चासाठी तळमळीने सामील झालो असलेने मला त्या प्रश्नांची जाण आहे. झालेली घटना जिव्हारी लागणारी आहे. कालच्या घटनेत महिला पोलिसांवर दगड फेक करणारा हा छत्रपती महराजांचा मराठा मावळा असूच शकत नाही.त्यामुळे ज्या विघातक प्रवृत्तीनी दगडफेक केली त्या उपद्रवी लोकांचा निषेधच, आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली आहे. मराठा समाजाने संयम बाळगत महायुतीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा असे आवाहन देखील सावंत यांनी केले आहे.
श्री. सावंत पुढे म्हणतात, या प्रकरणातील दोषींवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्चितच कडक कारवाई करतील. पण या प्रकरणातून विरोधक केवळ राजकारण करण्याचा प्रयत्न करत असून जाणीवपूर्वक देवेंद्रजींना टार्गेट केलं जात आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाची ढाल करत यावर राजकारण करणाऱ्यांची मराठा समाज नोंद घेईल. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात . देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी मोठे प्रयत्न केले आणि या विषयाला मूर्त रुप दिलेही. मराठा आरक्षणात कायदेशीर लढणाऱ्या सर्वांना एकत्र करत देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय पुढे नेला. आरक्षण मिळवले आणि टिकवूनही दाखविले. मात्र मविआच्या कार्यकाळात हा लढा कायदेशीर प्रकरणात अडकल्याने यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आजवर मराठा समाजाने हा लढा अतिशय संयतपणे आणि संयमाने लढलेला आहे. त्यामुळे आरक्षण मिळवून देण्याचा मा. देवेंद्रजींचा प्रामाणिक प्रयत्न असेल !
सकल मराठा समाजाला आवाहन
भाजपा चा जिल्हाध्यक्ष आणि एक मराठा कार्यकर्ता म्हणून माझी तमाम मराठा समाजातील माझ्या बांधवांना विनंती आहे की ह्या घटनेचे पडसाद उमटू देऊ नका.आजवर आपण शिस्तबद्ध आंदोलने आणि मोर्च्यांतुन जगाला आदर्श घालून दिला आहे, तो खरंच वाखाणण्यासारखा आहे,त्याला मिळालेले चुकीचे वळण त्या प्रतीमेला तडा जाणारं ठरेल,आणि ते समाजाच्या प्रतिमेला परवडणार नाही. तुम्ही कोणाच्या राजकारणाला आणि भूलथापांना बळी पडणार नाही ह्याबद्दल मला आणि माझ्या पक्षाला खात्री आहे. भाजपाने कधीही तोडफोडीचे, भुलथापांचे राजकारण केले नाही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि
अजितदादा पवार कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण नक्कीच मिळवून देतील याची खात्री बाळगा. मराठ्यांचा महायुती सरकारवर विश्वास आहे युतीचेच नेते सकारात्मक आहेत हे लवकरच स्पष्ट होईल. असा विश्वास देखल प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला आहे.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.